“Let the technology get so advanced,

That, Human Xerox machines arrive,

So that I could take one copy of yours

& keep it for my life.”

“आज शिकतलों, फ़ाल्यां शिकतलों

म्हणत अशेच दिस गेले

Exam लागीं पावली आनी

Backआचेर back पडले.

Engineering कॉलेजींत

जीण म्हजी विटल्या

सदां सदां Lecture आयकून

कानूय बी किटल्या.

नाका नाका शें दिसता सगळें

आवड कसलीच उरुंक ना

Job मेळना म्हणून

शिकपाची उमेद मात मरुंक ना.”

“वाट बघत राहीन

तू येशील अशी आशा आहे

तू माझी, मी तूझा

हीच एक भाषा आहे.”

भांगराकाळ

“एक शेंत

ते शेतांत मदीं व्हाळ

आनी व्हाळांत दिसपी तें सुर्यबिंब

गूणे शेवटावन

व्हाळांतलें उदक आंगार उसळांवन

भिजतां हांव ओलो चिंब

आलतडीं मेंरेर balance करीत चल्लां हांव

सकयल जळू तीर धरून रावल्यात

पलतडीं पेरीसकयल इश्ट म्हगेले

किर धरुंक बसल्यात.

दोंगरापोंदा वचपी सुर्या

पांचवेंचार शेंत आनी हो व्हाळ

हीच म्हजी जीण आनी होच जीणेंतलो भांगराकाळ.”

काव्यात्मक अहवाल

शिवरात्रीनिमित्त I.C.C. च्या स्नेहसम्मेलनास लिहिलेला अहवाल – ६ मार्च २००८

सुस्वागतम्‌,

नमस्कार, मी वर्धन कामत, Independent Cricket Club च्या वतीने आपलं सर्वांच करतो स्वागत. अन्‌, अहवाल वाचायला सुरुवात करतो, माझ्यापुढे असलेल्या श्री वेताळेश्वराचे आशिर्वाद मागत.

मित्रांनो, दरवर्षी शिवरात्रीला आम्हांला

सांगावं लागतं तुम्हांला

गेल्या वर्षभरात आम्ही काय काय केलं

काय काय मिळवलं अन्‌ काय काय गमावलं.

आम्ही आमची जबाबदारीच समजतो, सांगणे तुम्हांला

कुठं, कधी आणि काय झालं?

किती आम्ही घेतले परिश्रम आणि काय काय पेललं.

बरंच काही आहे सांगण्यासारखं ह्या अहवालात, कारण भरपूर आहे यादी

तरीपण तुम्हांला आणखीन काही सांगायचंय त्याहूनही आधी.

मित्रांनो, सांगावसं वाटतं तुम्हांला,

बक्षिस वितरण समारोह संपन्न झाल्यावर, रंगणार आहे इथे बरेचसे कार्यक्रम.

तेव्हा, तुम्ही कूठेही जाऊ नये, बसून रहावे, ही विनंती आहे नम्र.

रंगणार आहे इकडे डॉ. अजय वैद्य यांचं ’केशवसुत ते कुसुमाग्रज’.

रंगणार आहे इकडे आमच्या बालकलाकारांची धमाल विनोदी ’भांगराची कोंबडी’

रंगणार आहे इकडे आमची सादर होणारी एकांकिका ’खेळ मांडियेला’.

पण आश्चर्याची गोष्ट सांगू का?

तुम्हांला मिळणार नाही बटाटवडा अन्‌ चहाचा पेला.

मित्रांनो, अहवाल वाचण्यापूर्वी तुम्हांला करुन देतो ओळख यंदाच्या कार्यकारी समितीची.

विनंती आहे, तुम्ही टाळ्या वाजवून प्रशंसा करावी ह्या कष्टकरी कमिटीची.

नेमणूक झाली श्री अरविंद वेलिंगकर ह्यांची क्लबच्या अध्यक्षपदी.

आणि श्री गजानन प्रभु गांवकर निवडले गेले क्लबचे सेक्रेटरी.

श्री विजयकुमार कामत झाले क्लबचे खजिनदार, आणि

सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री रामकृष्ण वेलिंगकर.

सांस्कृतिक, क्रिडा अशा विविध विभागात, विभागले गेले क्लबचे इतर सदस्य आणि पदाधिकारी, ह्यांच्याच मार्गदर्शनाखाली.

आणि क्लबच्या कार्याला चालना देण्यासाठी यशस्वी वर्षाची सुरुवात झाली.

सदस्यांची विभागणी झाल्यानंतर आम्ही हातात घेतले अनेक उपक्रम

आयोजन केलं विविध स्पर्धांचं, आणि इतर यशस्वी कार्यक्रम.

रसिक हो, आज आम्ही Independent Cricket Club चा ४२ वा वर्धापनदिन साजरा करतोय

त्यानिमित्त आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार करतोय.

आज सत्कार होणार आहे, आमच्याच गावातील ज्येष्ठ शिक्षक, श्री केरकर सर ह्यांचा.

त्यानंतर गौरव होणार आहे १०वीत आणि १२वीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा.

मित्रांनो, आपण चतुर्थीला, दिवाळीला, किंवा भाऊबीजेला मिठाई देत असतो, घेत असतो

पण स्वातंत्र्यदिवशी शाळेतील मुलांना मिठाई वाटणारा Independent Cricket Club एकच असतो.

Independent Cricket Club ने Independence Day च्या शुभमुहुर्तावर आपल्या कार्याला सुरुवात केली.

१५ ऑगस्ट २००७ म्हणजे स्वातंत्र्यदिनी आम्ही वेलिंगमध्ये जणू दिवाळीच मनवली.

भारत स्वतंत्र होऊन ६० वर्ष पूर्ण झाली आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही, आम्ही वेलिंग व खाजन शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटली.

मित्र हो, तुम्ही नारळ फ़ोडण्याचा प्रयत्न केलाय का कधी?

मला नाही वाटत, निदान तरुण वर्ग तरी…..

बरोबर, नारळफ़ोड स्पर्धा, घडवून आणली होती आमच्याच सदस्यांनी

जेव्हा नरकासूर थैमान माजवत होते गोव्यात इतर ठिकाणी.

दिपावलीनिमित्त, Independent Cricket Club आयोजित

होती नारळफ़ोड स्पर्धा, वेलिंगपूर्ती मर्यादित.

मित्रांनो, खरंच सांगतो,

ह्या अनोख्या स्पर्धेत, ज्येष्ठ नागरीक आणि तरुण होते एकमेकांचे प्रतिस्पर्धी

नारळच नारळ फ़ोडले होते ह्या लोकांच्या अफ़ाट गर्दीत.

तद्‌नंतर मित्रांनो, इकडे वेताळेश्वर कालोत्सवानिमित्त

आम्ही, अखिल गोमंतकिय आकाशकंदिल स्पर्धा आयोजित केली.

जिकडे, गोव्याच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांनी आपली उपस्थिती लावली.

मोठ्या संख्येने हजर होते प्रेक्षकगणही ही अनोखी स्पर्धा पहायला

दूरवरुन आलेल्या कलाकारांचं आणि कंदिलांचं कौतुक करायला.

मित्रांनो, त्या रात्री कमी नव्हती गोव्याबाहेरून आलेल्या प्रेक्षकांची

ज्यांनी इच्छा दर्शवली होती, आकाशातून आणलेल्या दिव्यांना विकत घेण्याची.

नंतर होतं सरस्वतीपुजन, त्यानिमित्त पण काही स्पर्धांचं आयोजन.

रसिक हो, आपल्या वेलिंग शाळेत सरस्वतीपुजनानिमित्त असतात भरगच्च कार्यक्रम.

किर्तनं असतात, भजनं पण असतात, असतात इथल्या शाळेतील मुलांसाठी भरपूर स्पर्धा

तेव्हा, आम्ही आयोजित करतो एक स्पर्धा, खास महिलाकर्ता

जिथे गावातील महिला दाखवितात आपलं कर्तूत्व

आमच्या ह्या स्पर्धेत, ’एक चिमुट एक वर्तुळ’.

मंडळी, ’दसरा पहायचा तर तो पेडण्यालाच’ अशी अनेकांची समजूत असते.

पण इथला दसरा तुम्ही कधी अनुभवलाय का?

नृसिंह, वेताळ आणि शांतादूर्गेचं मिलन होतं

तिथं सोनं कधी तुम्ही लुटलंय का?

ह्या देवतांच्या पालख्या, प्रत्यक्ष आपल्या बोटावर पेलण्याचा आनंद कधी घेतलाय का?

ह्या आनंदोत्सवात अधिकच भर पडावी म्हणून

क्लबने केली होती फ़टाक्यांची आतषबाजी आणि विद्युत रोषणाई.

मित्रांनो,

सांस्कृतिक विभागात आणखीन ब़ऱ्याच घडामोडी आहेत. त्यांची नोंद सुध्दा आहेच पुढे.

पण, तत्पूर्वी आपण लक्ष देऊया क्रिडा विभागावर थोडे.

रसिक हो,

क्लबच्या नावामध्येच “Cricket” हा शब्द असल्यामुळे आम्ही ही स्पर्धा करतोच करतो.

आणि बहूतेक वेळा आमचाच संघ इकडे विजयी ठरतो.

यंदाच्या वर्षी, अखिल गोमंतकिय टॅनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दोन वेळा आयोजित केली गेली.

तर २४ संघापूर्ती मर्यादीत अखिल गोमंतकिय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धा अभियांत्रीकी मैदानावर खेळवण्यात आली.

यंदा ह्या स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी आम्हांला लाभले होते डॉ. अनिल देसाई.

आणि नंतर खेळवण्यात आलेल्या क्लबच्या वयस्क आणि कनिष्ठ गटातील सामन्यात कनिष्ठ झाले होते विजयी.

त्यानंतर होतं आयोजन, वर्षातल्या सर्वात मोठ्या “Event “ चं.

हे संयोजन होतं ८ जानेवारी २००८ ते १३ जानेवारी२००८ अशा भव्य सहा दिवसांचं.

“ श्री वेताळेश्वर करंडक मराठी एकांकिका स्पर्धा”

अखिल भारतीय मराठी भाषा प्रांतापूर्ती मर्यादीत अशी एकांकिका स्पर्धा पहिल्यांदाच ’Independent Cricket Club’ ने श्री वेताळेश्वराच्या सभागृहात घडवून आणली.

आणि हे केवळ शक्य झालं, ते नृसिंह, वेताळेश्वर आणि शांतादुर्गेच्या कृपेनं,जेव्हा इथल्या समितीनं आम्हांला पाहिजे ती मदत दिली.

देसाई प्रतिष्ठान आणि डॉ. अनिल देसाई यांची बहुमुल्य अशी मदत आम्हांला लाभली.

अन्‍ १०० टक्क्याहून अधिक असं यश आम्ही मिळवलं जेव्हा दर दिवशी ७०० ते ८०० कलाप्रेमींनी आपली उपस्थिती लावली.

सादर होणऱ्या प्रत्येक एकांकिकेचा आनंद आपण लूटावा, म्हणून अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

प्रत्येकाला बटाटवडा आणि एक कप चहा दिली होती.

ह्या संपूर्ण सहा दिवसांच्या कार्यक्रमात क्लबच्या सर्व सदस्यांचं काम प्रशंसनीय होतं.

आणि प्रथमच आयोजिलेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांनी पूढच्या स्पर्धेसाठी आपलं नाव निश्चित केलं होतं.

मित्र हो, इथे सहभागी झालेल्या प्रत्येक संस्थेनं जाताना आम्हांला सांगितलं, कि इथले प्रेक्षकगण आहे फ़ारच छान.

कोण जिंकेल याची आम्हांला परवा नाही, ह्या प्रेक्षकांसमोर “Perform” करायला संधी मिळाली हाच आहे आमचा सन्मान.

रसिक हो, आपणच आपल्या उपस्थितीनं रंगवले होते ते सहा दिवस भव्य

अन्‍ शेवटच्या दिवशी ऐकलं होतं श्री अवधूत कामत यांचं काव्य.

मित्र हो, इथंच आपल्याला बहूमान मिळाला बघायला श्री दयानंद भगत यांचा सत्कार

आजवर ठरलेले, गोव्यातील सर्वश्रेष्ठ चित्रकार.

ह्या स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्याला आम्हांला लाभले होते ज्येष्ठ साहित्यीक श्री विष्णु सुर्या वाघ आणि गोवा सांस्कृतिक व कला संचालनालयाचे श्री प्रसाद लोलयेंकार.

मंडळी, यंदाच्या “Twenty Twenty World Cup “ चा आनंद सर्वांनी एकत्रित लूटावा म्हणून क्लबच्या” Building” मध्ये आम्ही मोठी “ T.V.” लावली होती.

आणि “World Champion “ झाल्यावर फ़ोंडा तालुक्यात ढोल ताशांवर विजयी मिरवणूक पण काढली होती.

रसिकहो, आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आपण आढावा घेतला.

आता वळूया, जिथे आम्ही आमचा सहभाग दाखविला.

मित्र हो,

आम्ही दररोज “ T.V.“वर बघत असतो, कोणावर आलेली खेळाची बंदी तर कोणासाठी कोणाचा खेळायला नकार.

इकडे मात्र उलटंच आहे सारं

चक्क आमच्या खेळाडूनींच माझ्याशी “Volleyball Game “ न बघण्याचा केला आहे करार.

“ Tournament“ बघायला पूर्वी जायचो मी म्हार्दोळ, प्रियोळला माझ्या “ Activa“ वर होऊन स्वार.

पण, त्यांनी आता धमकीच दिलीय, वर्धन, तू येऊच नकोस, तू आलास तर आमची नक्कीच आहे हार.

मी पण आता जातच नाही, का त्यांना मैदानावर उगीच माझा भार?

देव जाणे हे कोडं कसलं, तेव्हापासून ते जिंकत आहे वारंवार.

खरंच, आमच्या “ Volleyball“ पटूंनी पटकावलंय ४ वेळा विजेतेपद.

४ वेळा ठरलो आम्ही उपविजेते आणि ३ वेळा उपांत्यफ़ेरीपर्यंत मजल मारली.

मघाशी सांगितल्याप्रमाणे “Tennis Ball “ क्रिकेटमध्ये ठरला आमचा संघ विजेता आणि पटकावलं एकदा उपविजेतेपद आणि सीझनबॉल स्पर्धेमध्ये उपांत्यफ़ेरीपर्यंत मजल मारली.

Folk Dance, अस्नोडा येथे लोकनृत्य स्पर्धेत आमच्या बालकलाकरांनी किर्ती दाखविली

आणि उत्तेजनार्थ बक्षिस घेत लोकांची वाहवा मिळविली.

कला अकादमी, तसेच गोव्यात इतर ठिकाणी आम्ही घुमट आरती स्पर्धेत सहभाग दाखवला

तिथे, आदर्श प्रभु गांवकर ह्या आमच्या बालकलाकाराला वैयक्तिक पुरस्कार प्राप्त झाला.

मित्रांनो, आम्ही आयोजित केलेली एकांकिका स्पर्धा पाहून आमच्याही सदस्यांना स्फ़ूर्ती आली.

आणि ’खेळ मांडियेला’ ही एकांकिका धारगळ आणि डोंगरी येथे स्पर्धेसाठी सादर केली

एवढं बोलून हा अहवाल संपवतो

आणि रंगमंचाचा ताबा घेण्यासाठी श्री गजानन प्रभु गांवकरना बोलावतो.

– धन्यवाद.

“आठवतंय?

तेव्हा तुझ्या डोळ्यातून

तरळणारे अश्रू?

मान्य आहे

मी आवरु शकलो नाही

पण त्यानंतर,

मी सुध्दा

स्वतःला सावरु शकलो नाही”

Newer entries »